Mahindra XEV 9e Launched: महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘XEV 9E’ चे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने कारचे टॉप-स्पेक (पॅक-3) व्हेरिएंट लाँच केले असून, या व्हेरिएंटची किंमत 30.50 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. मागच्या वर्षी कंपनीने या एसयूव्हीचे बेस व्हेरिएंट (पॅक 1) लाँच केले होते. या व्हेरिएंटची सुरुवाती किंमत 21.90 लाख रुपये आहे. कार खरेदी करताना चार्जरसाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
Mahindra XEV 9e ची बुकिंग आणि डिलिव्हरी
कंपनीने अद्याप Mahindra XEV 9e च्या मिड-स्पेक व्हेरिएंटच्या (पॅक 2) किंमतीची घोषणा केलेली नाही. टॉप व्हेरिएंटचे बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर कारची डिलिव्हरी मार्च महिन्यात सुरू होईल. ग्राहक इलेक्ट्रिक एसयूव्हीला कंपनीच्या अॅपवरून विशलिस्ट करू शकतात.
Mahindra XEV 9e चे फीचर्स
Mahindra XEV 9e मध्ये फ्युचरिस्टिक डिझाइन देण्यात आलं आहे. कारची साइज महिंद्राच्या XUV700 पेक्षा मोठी आहे. यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्पसह ट्रायँग्युलर हेडलाईट्स, उलट्या L-आकाराच्या LED डे टाइम रनिंग लाइट्स (DRL), समोरच्या बाजूला LED लाइट बार, नवीन फ्रंट आणि रियर बंपर, ब्लँक्ड-ऑफ ग्रिल, फ्रंट आणि रियर स्किड प्लेट आणि कॉन्ट्रॅस्ट रंगाचे आउटसाइड रियर व्ह्यू मिरर (ORVM) देण्यात आले आहेत.
यामध्ये खास डिझाइन करण्यात आलेले एअरो ऑप्टिमाइज्ड 19 इंच एलॉय व्हील देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना 20 इंच एलॉय व्हीलचा देखील देण्यात आले आहे. मागील बाजूला बूट स्पॉइलरच्या खाली कनेक्टेड एलईडी टेल-लाइट्स मिळेल.
महिंद्राची ही एसयूव्ही INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीने कारला 59kWh आणि 79kWhसह दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केले आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये लिथियम-आयरन फॉस्फेट बॅठरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, 79kWh युनिट मॉडेल सिंगल चार्जमध्ये 656 किलोमीटरची रेंज देते.
या 5 सीटर कारमध्ये 3 वेगवेगळे 12.3 इंचाचे स्क्रीन देण्यात आले आहे. हे अँड्रेनॉक्स सॉफ्टवेअरवर चालतात. यामध्ये टू-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टेअरिंग व्हील देण्यात आले आहे. यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ड्राइव्ह मोड आणि ब्रेक-बाय-वायर टेक्नोलॉजी देखील मिळते.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही कंपनीने अनेक चांगले फीचर्स दिले आहेत. यामध्ये पॅनोरामिक सनरूफ, लेव्हल 2 ADAS सूट, 7 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ट्वीक्ड सेंटर कन्सोल, नवीन गिअर लीव्हर आणि एक रोटरी डायल असे दिले आहेत. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB), 1400-वॉट हरमन-कार्डनची 16-स्पीकर म्युझिक सिस्टिम, ऑटो पार्क फंक्शन, वायरलेस मोबाइल प्रोजेक्शन, 65W USB टाइप-C चार्जिंग पोर्ट, शेड्यूल चार्जिंग फंक्शन आणि केबिन प्री-कूलिंग फंक्शन देखील यात मिळले.