Home / News / मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी 

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी 

मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे...

By: E-Paper Navakal

मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली होती. आता पावसाळी अधिवेशनात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावेदेखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती. राहुल शेवाळे यांनी करी रोडचे नाव लालबाग, सॅन्डहर्स्ट रोडचे – डोंगरी स्टेशन, मरीन लाइन्सचे – मुंबा देवी, चर्नी रोडचे  – गिरगाव, कॉटन ग्रीनचे – काळा चौकी, किंग्ज सर्कलचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ, डॉकयार्डचे माझगाव तर मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगन्नाथ शंकर सेठ करण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला सरकारने मार्च महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली होती. स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मंजूरीनंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलली जातील.

Web Title:
संबंधित बातम्या