Home / News / यंदा दगडूशेठ गणरायाला जटोली शिवमंदिराचा देखावा

यंदा दगडूशेठ गणरायाला जटोली शिवमंदिराचा देखावा

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’चा देखावा केला असून तो...

By: E-Paper Navakal

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोतस्वात भारतातील विविध मंदिरे, राजप्रासाद यांच्या प्रतिकृती साकारते.देशातील सांस्कृतिक परंपरेचे जतन करून राष्ट्रीयत्वाची भावना वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीने केला जातो.

या वर्षीच्या गणेशोत्सवात संस्थेतर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’ हा देखावा उभा केला आहे. नयनरम्य विद्युत रोषणाईने तो नटविण्यात आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे सामूहिक अथर्वशीर्ष पठण, हरी जागर, सामूहिक अग्निहोत्र, ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक, महाअभिषेक, गणेश याग, सत्यविनायक पूजा, मंत्र जागर यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामूहिक सूर्यनमस्कारांचे आयोजन केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या