SSC Exam Maharashtra Board Exam 2025: राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून 11 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, पुढील काही दिवसांमध्ये दहावीच्या परीक्षेला देखील सुरुवात होणार आहे. तुम्ही ऑनलाइन देखील परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ यावर SSC परीक्षेचे वेळापत्रक 2025 जाहीर केले आहे. या वेबसाइटवरून तुम्ही वेळापत्रक डाउनलोड करू शकता.
दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 17 मार्च 2025 पर्यंत ही परीक्षा चालेल. परीक्षेचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी 2 असेल. तर काही विषयांची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित केली जाईल.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
- दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होम पेज खाली स्क्रोल करा.
- आता महाराष्ट्र बोर्ड SSC टाइम टेबल 2025 या लिंकवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला वेळापत्रक दिसेल. ते तुम्ही डाउनलोड करू शकता.
दरम्यान, परीक्षेला जातानी विद्यार्थ्यांनी काही सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कमीत कमी अर्धातास केंद्रावर उपस्थित राहावे. निर्धारित वेळेच्या काहीवेळ आधीच केंद्रावर उपस्थित राहावे, जेणेकरून कोणतीही समस्या येणार नाही. तसेच, हॉल तिकीटावर नमूद असलेल्या गोष्टीच परीक्षा केंद्रात घेऊन जाव्यात.