रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची अफवा

मुंबई – उद्योगपती रतन टाटा आज सकाळी मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची अफवा पसरली. त्यानंतर रतन टाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, माझी प्रकृती स्थिर असून नियमित तपासणी करण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो.पुढे ते पोस्टमध्ये म्हणाले की, माझ्या प्रकृतीबद्दल पसरलेल्या अफवांबद्दल मला माहिती मिळाली आहे. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, या बातम्या निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काहीच नाही. माझी तब्येत ठीक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की चुकीची माहिती पसरवणे टाळावे.