Home / News / रत्नागिरीत भात कापणीच्या कामाला वेग

रत्नागिरीत भात कापणीच्या कामाला वेग

कणकवली – गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे . त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातकापणी ,तसेच भात झोद्नी सुरु...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कणकवली – गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली आहे . त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातकापणी ,तसेच भात झोद्नी सुरु केली आहे.मात्र तळकोकणात म्हणजेच कुडाळ , मालवण , वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये अजून काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे.
अवकाळी पडलेल्या पावसाने ग्रामीण भागात भातशेतीचे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, पूर्णगड, पावस येथे भात कापणी, भात झोडणी कामांना वेग आला आहे. तसेच शेतकरी बांधव शेती कामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. हलव्या भातपिकांची कापणी सुरु असून वलाट पट्टयात कातळावरील भातकापणीला वेग आला आहे तर खलाट पट्टयातील मळे शेतीच्या भातकापणीला चिखल असल्याने अडथळा निर्माण होत आहे. भात कापून सुकविण्यासाठी दूर न्यावे लागत आहे त्यामुळे शेतकर्‍यांंना भार्‍याची ने-आण करण्यास वेळ जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या