Home / News / ‘राधानगरी’ चे २ दरवाजे उघडले ४३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

‘राधानगरी’ चे २ दरवाजे उघडले ४३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि सकाळी ९.१५ वाजता पाच क्रमांकाचा दरवाजा खुला करण्यात आला.सध्या या दोन्ही दरवाजातून २८५६ व वीज गृहातून १५०० असा एकुण ४३५६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होते.मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने राधानगरी पाणलोट क्षेत्रात पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.त्यामुळे या धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. परिणामी आज दोन स्वयंचलित स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले होते.

Web Title:
संबंधित बातम्या