POCO ची बहुचर्चित स्मार्टफोन सीरिज POCO X7 लवकरच लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचआधी फोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती समोर आली आहे. ग्लोबल मॉडेल्समध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra सारखे पॉवरफुल चिपसेट दिले जाईल. याशिवाय, 90W पर्यंत फास्ट चार्जिंगसह 6000mAh पर्यंतची बॅटरी मिळू शकते.
POCO X7 आणि X7 Pro ची किंमत
POCO X7 आणि X7 Pro च्या लाँचिंगबाबत कंपनीने माहिती दिली आहे. पोको एक्स7 सीरिज 9 जानेवारीला जागतिक बाजारात लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार, POCO X7 5G दोन कंफिग्रेशनसह येईल. याच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत जवळपास 27 हजार रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 31 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
POCO X7 Pro मध्ये तीन कंफिग्रेशन पाहायला मिळू शकता. फोन 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंटमध्ये येईल. या फोन्सची जागतिक बाजारात किंमत 33 हजार रुपये ते 38 हजार रुपयांपर्यत असू शकते.
POCO X7 आणि X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
POCO X7 मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर मिळू शकतो. फोनमध्ये में LPDDR4X RAM आणि UFS 2.2 स्टोरेज पाहायला मिळू शकतो. याशिवाय, 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5110mAh बॅटरी दिली जाईल.
Poco X7 Pro हा सेगमेंटमधील आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल फोन असेल, असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये LPDDR5x रॅम आणि UFS 4.0 स्टोरेजचा सपोर्ट मिळेल.
Poco X7 Pro मध्ये आधुनिक कुलिंग सिस्टम दिली जाईल. याला कंपनीने Ultra-Thin 3D IceLoop सिस्टम असे नाव दिले आहे. यामुळे फोन किती वापरला तरीही गरम होणार आहे. फोन HyperOS 2 वर काम करेल. फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा 6.67 इंच ओलेड डिस्प्ले दिला जाईल. तसेच, 50 मेगापिक्सल ड्युल रियर कॅमेरा आणि 90 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.