Home / News / लालकृष्ण अडवाणीपुन्हा रुग्णालयातनवी

लालकृष्ण अडवाणीपुन्हा रुग्णालयातनवी

दिल्ली – भाजपाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना काल पुन्हा प्रकृती खालावल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपोलो रुग्णालयात डॉ. विनीत पुरी हे अडवाणींवर उपचार करीत आहेत. अडवाणींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अडवाणी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी २७ जून रोजी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.