Home / News / वनस्पतीच्या नव्या संशोधित प्रजातीला शिवरायांचे नाव

वनस्पतीच्या नव्या संशोधित प्रजातीला शिवरायांचे नाव

कोल्हापूर-विशाळगड किल्ल्यावर शोधण्यात आलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले असून या माध्यमातून संशोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोल्हापूरच्या न्यू कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभाग, अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार, चांदवड येथील डॉ. शरद कांबळे तसेच शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ.एस.आर.यादव यांच्या चमूने विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील या नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या नव्या वनस्पतीला सेरोपेजिया शिवलायीना असे नाव दिले आहे. या वनस्पतीच्या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या आंतरराष्ट्रीय नियतकालीकातही शिवाजी महाराजांचे नाव नमूद करण्यात आले. विशाळगडावर सध्या ही प्रजाती मर्यादित स्वरुपात असली तरी आजूबाजूच्या डोंगरांवरही ती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी आतापर्यंत सेरोपेजिया वर्गातील ६ वनस्पती शोधून काढल्या आहेत.