Home / News / विक्रमी गर्मीनेजपान होरपळला

विक्रमी गर्मीनेजपान होरपळला

टोकियो- जपानमध्ये सध्या गर्मीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.जपानच्या टोकाई आणि कांटो परिसरात काल पारा विक्रमी ४० अंश सेल्सीअसवर पोहोचला होता.जपानच्या...

By: E-Paper Navakal

टोकियो- जपानमध्ये सध्या गर्मीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.जपानच्या टोकाई आणि कांटो परिसरात काल पारा विक्रमी ४० अंश सेल्सीअसवर पोहोचला होता.जपानच्या हवामान विभागाने देशातील २६ प्रांतांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) अलर्ट जारी केला आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.यावर्षी पहिल्यांदाच जपानमध्ये दोनशे शहरे उष्णतेच्या लाटेचा सामना करीत आहेत. जनतेला आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या