विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

विरार – विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्मजा कासट असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.

महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांना मागून भरधाव येणार्‍या फॉर्च्युनर गाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे आत्मजा दुभाजकावर जाऊन आदळल्या. या अपघातात आत्मजा गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर कारचालकाने आत्मजा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुभम पाटील याला अटक केली.

Share:

More Posts