Home / News / वेतन कराराच्या मागणीसाठी बंदर,गोदी कामगारांची निदर्शने

वेतन कराराच्या मागणीसाठी बंदर,गोदी कामगारांची निदर्शने

मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन कराराची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या कराराची तत्काळ अंमलबजावणी करावी,या मागणीसाठी प्रमुख बंदारांमध्ये आज गुरुवारी तीव्र निदर्शने करण्यात आली.या निदर्शनामध्ये प्रमुख कामगार नेत्यांनी गोदी कामगारांना आंदोलनाविषयी मार्गदर्शन केले.
मुंबई बंदरात आंबेडकर भवन येथे आज झालेल्या निदर्शनामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, प्रदीप नलावडे, विद्याधर राणे, दत्ता खेसे,मनीष पाटील, शीला भगत, विष्णू पोळ, रमेश कुऱ्हाडे, मिर निसार युनूस,आप्पा भोसले , संतोष कदम.व इतर पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी केरसी पारेख, बबन मेटे,बापू घाडीगावकर व इतर पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे विजय कांबळे,फ्लोटीला वर्कर्स असोसिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.या सर्वांच्या उपस्थितीत गोदी कामगारांनी तीव्र निदर्शने केली. तसेच यापुढील आंदोलनात १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व कुटुंबिय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७ डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर बेमुदत संप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.