Home / News / शनिशिंगणापूरमध्ये रात्रीचे दर्शन बंद

शनिशिंगणापूरमध्ये रात्रीचे दर्शन बंद

अहिल्यानगर –शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी २४ तास खुले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरातील शनी मंदिर आता रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या...

By: Team Navakal

अहिल्यानगर –शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी २४ तास खुले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरातील शनी मंदिर आता रात्रीच्या वेळेस बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमित साफसफाईसाठी ११ जूनपासून दररोज रात्री १०.३० ते पहाटे ४ या वेळेत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

देवस्थान समितीच्या माहितीनुसार, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यावश्यक होता. मंदिर परिसरात सुरक्षारक्षकांची वाढती गरज, कमिशन एजंटांचा त्रास आणि भाविकांच्या होणाऱ्या फसवणुकीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. त्याचबरोबर परिसराच्या स्वच्छतेसाठी रात्री काही वेळ मंदिर बंद ठेवण्याची आवश्यकता जाणवली. त्यामुळे अखेर रात्रीचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शनी अमावस्या, गुढीपाडवा, शनी जयंती यांसारख्या विशेष दिवशी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. इतर दिवशी रात्री दर्शन बंद असले तरी लांबून आलेल्या भाविकांसाठी ७०० ते ८०० जणांना थांबता येईल अशी भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या