Home / News / शरद पवार ४ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

शरद पवार ४ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार भेटीगाठीचा कार्यक्रम व बैठकांचे आयोजन केले आहे. तसेच कागल येथील गैबी चौकात शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. समरजितसिंह घाटगे तुतारी हाती घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपाटणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय महत्त्व आले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या