मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ झाली.सेन्सेक्स १५१ अंकांनी घसरून ८२,२०१ वर बंद झाला. तर निफ्टी ५४ अंकांच्या घसरणीसह २५,१४५ अंकांवर बंद झाला.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र चांगली तेजी दिसून आली. हिरो मोटोकॉर्प सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. तर टायटनचा शेअर ३ टक्क्यांनी वाढून ५ महिन्यांच्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला.
