Home / News / श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावर हरिणी अमरसूर्या विराजमान

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावर हरिणी अमरसूर्या विराजमान

कोंलबो – श्रीलंकेत १४ नोव्हेंबरला झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या एनपीपीने विजय मिळवला होता. त्यानंतर दिसानायके यांनी...

By: E-Paper Navakal

कोंलबो – श्रीलंकेत १४ नोव्हेंबरला झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या एनपीपीने विजय मिळवला होता. त्यानंतर दिसानायके यांनी हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावर निवड केली. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याआधीच त्या हंगामी पंतप्रधान होत्या.अमरसूर्या यांनी १९९१ ते १९९४ या काळात दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ५ वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. श्रीलंकेत २ महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्ये त्या पंतप्रधान होत्या. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दिसानायके यांनी त्यांना पुन्हा पंतप्रधान केले. श्रीलंकेच्या संसदेचे पहिले अधिवेशन २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी संसदेतील बहुतांश खासदार नव्याने निवडून आले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या