Home / News / सचिन वाझेच्या जामिनाचा निकाल २३ ऑगस्ट रोजी

सचिन वाझेच्या जामिनाचा निकाल २३ ऑगस्ट रोजी

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात...

By: E-Paper Navakal

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय २३ ऑगस्ट रोजी आदेश देणार आहे.या याचिकेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून निर्णय मात्र राखून ठेवण्यात आला आहे

सचिन वाझेने अ‍ॅड.रौनक यांच्यामार्फत तळोजा मध्यवर्ती कारागृहातून हस्तलिखित जामीन अर्ज पाठवला होता.न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर वाझेने तुरुंगातून सुटकेसाठी केलेल्या या याचिकेवर सुनावणी झाली.त्यावेळी त्याचे वकील आबाद पोंडा यांनी म्हटले की,वाझेला या प्रकरणात माफीचा साक्षीदार केले आहे.तो २०११ पासून तुरुंगात आहे.या गुन्ह्यातील इतर सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. असे असताना आणि तो माफीचा साक्षीदार असताना त्यालाच तुरुंगात का ठेवले आहे.हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.त्याला महाराष्ट्र साक्षीदार संरक्षण आणि सुरक्षा कायदा, २०१७ अंतर्गत संरक्षण देण्यात यावे.सचिन वाझेने कलम ३०६(४) च्या तरतुदीचा हवाला देत सुटकेची मागणी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या