सरकारी नोकरीची संधी, रेल्वेत 32000 पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

RRB Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने (RRB) तब्बल 32000 हजार जागांसाठी भरती जारी केली आहे. भारतीय रेल्वेकडून लेव्हल 1 अंतर्गत ग्रुप डी च्या पदांची भरती जाहीर करण्यात करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार कसे अर्ज करू शकतात, याविषयी जाणून घेऊया.

32438 पदांसाठी निघाली भरती

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून 32438 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पॉइंटमॅन-बी, सहाय्यक (ट्रॅक मशीन), सहाय्यक (सेतू), ट्रॅक मेंटेनर Gr. IV अभियांत्रिकी, असिस्टंट पी-वे, सहाय्यक (C&W), सहाय्यक TRD इलेक्ट्रिकल, सहाय्यक (S&T), असिस्टंट लोको शेड (डिझेल), असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), असिस्टंट ऑपरेशन (इलेक्ट्रिकल), सहाय्यक TL आणि AC, सहाय्यक TL आणि AC (कार्यशाळा) आणि सहाय्यक (कार्यशाळा) (यांत्रिक) या पदांसाठी समावेश आहे.

पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

अर्ज करण्याची तारीख

इच्छुक व पात्र उमेदवार 23 जानेवारीपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

अर्ज शुल्क

उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क असेल. PwBD / महिला / ट्रांसजेंडर / माजी सैनिक/ SC/ST/ अल्पसंख्यक समुदाय आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी शुल्क 250 रुपये असेल. परीक्षा शुल्क ऑनलाइन माध्यमातून करता येईल.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक व पात्र उमेदवार RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर गेल्यावर होमपेजवर 08/2024 अंतर्गत देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती व शुल्क भरून अर्ज सबमिट करा.