मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांना २६ आरोपींना अटक करण्यात यश आले होते. याप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी पार पडली.या हत्याकांडातील २६ पैकी मुख्य आरोपीसह ८ आरोपींना न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर आरोपींविरुद्ध मोक्काची गंभीर कलमे लावली होती.
