मुंबई – बॉलिवूडमधील लोकप्रिय कला दिग्दर्शक रजत पोतदार यांचे आज लंडनमध्ये निधन झाले.त्यांच्यासोबत काम केलेले लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पोतदार यांच्या निधनाची माहिती दिली.भूल भुलय्या -३ , ड्रीम गर्ल , विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ, फायटर आणि फ्रेडी यांसारख्या चित्रपटांमधील कला दिग्दर्शनामुळे रजत पोतदार लोकप्रिय झाले होते.त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी दुजोरा दिला. रजतला कोणताही आजार नव्हता. निधन झाले त्याच्या आदली रात्री आमच्यामध्ये बोलणे झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्का बसला. तो एक चांगला माणूस आणि खस मित्र होता,असे बज्मी यांनी सांगितले.
