Home / News / हत्तींना धडकल्यामुळे रेल्वे रुळावरून घसरली

हत्तींना धडकल्यामुळे रेल्वे रुळावरून घसरली

कोलंबो – हत्तींच्या कळपाला धडकल्यामुळे इंधनाची वाहतूक करणारी एक रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना श्रीलंकेत घडली आहे.या घटनेत रेल्वेची जोरदार धडक...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कोलंबो – हत्तींच्या कळपाला धडकल्यामुळे इंधनाची वाहतूक करणारी एक रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना श्रीलंकेत घडली आहे.या घटनेत रेल्वेची जोरदार धडक बसल्यामुळे दोन हत्ती ठार झाले.ही मालगाडी जवळपास एक लाख लीटर पेट्रोलची वाहतूक करत होती.

श्रीलंकेच्या पूर्व भागात झालेल्या या अपघातामुळे बाट्टिकालोआ ते कोलंबो दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कोलंबोहून पूर्वेकडील बट्टिकालोआ शहराकडे ही रेल्वे चालली होती.ती कोलंबोपासून १०० किलोमीट अंतरावर मिनेरिया आणि हिंगुराकगोडा रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान कळपावर धडकली. यावेळी रेल्वेरुळावर १० पेक्षा जास्त हत्ती होते.ब्रेक लावूनदेखील रेल्वे थांबू शकली नाही.धडकेनंतर रेल्वेचे ४ डबे रुळावरून घसरले. त्यातील सुमारे ५ हजार लीटर पेट्रोल सांडले. दोन हत्ती ठार झाले तर अन्य काही हत्ती जखमी झाले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या