हिमाचल प्रदेशात शौचालयावर२५ रुपयांचा कर लागणार

शिमला- हिमाचल प्रदेश सरकारने लोकांना मोफत पाणी देणे बंद केले आहे. आता नागरिकांना दरमहा १०० रुपये पाणी भाडे द्यावे लागणार आहे. यासोबतच मलनिस्सारण शुल्क आणि प्रत्येक शौचालयासाठी २५ रुपयेही द्यावे लागणार आहेत. हे शुल्क फक्त ज्या भागात मलनिस्सारणाची सुविधा आहे तेथेच लागू होईल.- कर आकारण्याची अधिसूचना पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओंकार शर्मा यांनी २१ सप्टेंबरला जारी केली होती. त्यानंतर मलनिस्सारण शुल्काबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती. या विभागाने आता याबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे. गेल्या सरकारने लोकांना मोफत पाणी दिले होते. आर्थिक संकटात अडकलेल्या राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आला.