वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हॉर्वर्ड या प्रतिष्टित विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना व्हीसा देण्यास बंदी घालण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
यापुढे हॉर्वड विद्यापीठात अंशकालीन किंवा संपूर्ण अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हीसा मिळणार नाही. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यापासूनच त्यांचे व हॉर्वर्ड विद्यापीठात विस्तव जात नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रम्प यांनी हॉर्वर्ड विद्यापीठाची विविध मार्गाने कोंडी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यात विद्यापीठाची बदनामी, त्यांचा निधी रोखणे, विद्यापीठाची विविध मार्गाने चौकशी करणे आदी कारवाई सुरू होती. काही दिवसांपूर्वी हॉर्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रमान्वये येणाऱ्या प्राध्यापकांना अतिरीक्त व्हीसाची अट टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट या व्हीसा बंदीच्या आदेशामुळे एका प्रकारे या परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशच बंदी करण्यात आली आहे. विद्यापीठात एका प्रकारे परदेशी विदयार्थ्यांना प्रवेश बंदीच करण्यात आली आहे. हॉर्वर्ड विद्यापीठातील पदवी जगभरात प्रतिष्ठेची समजली जाते.
