नवी मुंबई – नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात (जेएनपीट) महसूल गुप्तचर संचालनालयाने ( Directorate of Revenue Intelligence) आज मोठी कारवाई केली. डीआरआयने पाकिस्तानातून आलेला ९ कोटींचा माल न्हावा शेवा बंदरातून जप्त केला. १,११५ मेट्रिक टन (1,115 metric tonnes)वजनाचा हा माल पाकिस्तानातून छुप्या पद्धतीने दुबईमार्गे भारतात आणला होता. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून (Pakistan )थेट किंवा अप्रत्यक्ष मार्गाने येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. याच पार्श्वभूमीवर डीआरआयने ही कारवाई केली.
या कारवाईत एकूण ३९ कंटेनर (39 containers)पकडले असून एका आयातदार कंपनीच्या भागीदाराला काल अटक करण्यात आली आहे. हे कंटेनर दुबईमार्गे (via Dubai)भारतात आल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानमधून वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात आणि वाहतुकीवर बंदी घालतलेली असतानाही पाकिस्तानने भारताच्या आयात नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणात आयात करणाऱ्या कंपनीच्या एका भागीदाराला अटक करण्यात आली आहे.