25-year-old Radhika Yadav tennis player from Haryana Killed by father
गुरुग्राम – हरियाणातील गुरुग्राम सेक्टर ५७ मध्ये राष्ट्रीय महिला टेनिसपटू(National tennis playe) राधिका यादव (२५) हिची वडीलांनीच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे देशात खळबळ उडालीआहे. राधिकाचे वडील आरोपी वडील दीपक यादव यांनी पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.(Radhika Yadav)
१० जुलैला आईच्या वाढदिवसानिमित्त राधिका स्वयंपाकघरात तिच्यासाठी काहीतरी खास बनवत होती. तिची आई तब्येत ठीक नसल्याने खोलीत आराम करत होती. त्याचवेळी दीपक यादव यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून राधिकावर पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्याचवेळी खालच्या मजल्यावर राहणारे तिचे काका कुलदीप यादव आणि चुलत भाऊ पियूष गोळीबाराचा आवाज ऐकून राधिकाच्या घरी आले. त्यांनी तिला तात्काळ एशिया मारिंगो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.(Killed by father)
दीपक यादव यांनी कबुली जबाबात सांगितले की, मी माझी मुलगी राधिकाची हत्या केली. मागील काही महिन्यांपासून मी अस्वस्थ होतो. गावातील लोक मला मुलीच्या कमाईवर जगतो असे टोमणे मारायचे. राधिकाच्या अकॅडमीत बाहेरचे लोक येतात, तिचे वागणे फार खुले आहे असे म्हणायचे. तिच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरायचे. वडील म्हणून मला समाजात मान राखून जगायचे होते. याबद्दल राधिकाला सांगितले होते. तिला टेनिस अकॅडमी बंद करायला सांगितली होती. पण तिने हेच माझे करिअर आहे. मी काही चुकीचे करत नाही, असे उलट उत्तर मला दिले. त्यानंतर तिच्या आईलाही सांगितले. पण तिनेही राधिकाची बाजू घेतली. राधिकावर माझे प्रेम होते पण तिने माझे ऐकले नाही. समाजाकडून होणार्या अपमानामुळे मला वडील म्हणून मला अपयशी वाटत होते.