900 police deployed on Mumbai-Goa route during Ganeshotsav
रायगड – कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा गणेशोत्सव(Ganeshotsav 2025) कालावधीत प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर(Mumbai Goa traffic) तब्बल ९०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.(Ganesh Chaturthi security) गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गावरील वाहतूक नेहमीपेक्षा १० ते १२ पट वाढते. ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर काल उबाठा गटाने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातील हुमरमळा येथे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने प्रवास सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणेच गणेशोत्सवात अवजड वाहनांना बंदी असणार आहे. तसेच पोलीस विभागामार्फत ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २२ पोलीस निरीक्षक, ७२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७६२ पोलीस कर्मचारी व होमगार्ड, राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दल तैनात केले जाणार आहे.
पोलिसांना गस्तीसाठी जीप व मोटारसायकली असणार आहेत. तसेच संपर्कासाठी ७४ बिनतारी संच देण्यात येणार आहेत. अपघात किंवा वाहन बिघाड झाल्यास महामार्ग मोकळा ठेवण्यासाठी २० टोकण क्रेन व्यवस्था केली जाणार आहे. याच सोबत २० रुग्णवाहिकांच्या फेऱ्याही महामार्गावर चालू राहणार आहेत. रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारिका असणार आहेत.