Conspiracy to Defame My Family Allege by Eknath Khadse
मुंबई – पुण्याच्या खेराडी येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात (Khadse son-in-law rave party case)आपल्या जावयाला विनाकारण गोवण्यात आले असून काहीही करून खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा(Eknath Khadse allegations) हा डाव आहे,असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.एकूणच या प्रकरणात पोलिसांच्या तपासावरच खडसे यांनी संशय व्यक्त केला.
माझे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar news)यांच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळले असा वैद्यकीय अहवाल मीडियाकडे कसा काय जातो, अल्कोहोलचा अहवाल मीडियाकडे जातो पण अंमली पदार्थाचे सेवन केले गेले की नाही याचा अहवाल पोलीस का दडपून ठेवतात,पोर्श कार अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलचा अनुभव ताजा आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचा अहवाल बदलला जाणार नाही यावर विश्वास कसा ठेवायचा, खेवलकर यांच्या मोबाईलमधील कुटुंबियांचे खासगी फोटो मीडियाला देण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला,असे प्रश्न खडसे यांनी यावेळी उपस्थित केले. या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.(Pune rave party controversy)
खेवलकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यांच्यावर याआधी एकही गुन्हा नोंद नाही. असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे खोटे सांगितले.(Narcotics report withheld)पोलिसांच्या कारवाईत त्या पार्टीत सहभागी असलेल्या एका महिलेच्या पर्समध्ये कोकेन हा अंमली पदार्थ सापडला असे पोलिसांनीच मीडियाला दिलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. खेवलकर यांच्याकडे अंमली पदार्थ आढळला नाही. तरीही मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी खेवलकर यांचे नाव दिले.त्यामुळे पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत,असे स्पष्ट दिसते असेही खडसे म्हणाले.(Sharad Pawar faction NCP news)
पाच-सात लोकांनी एकत्र येऊन केलेल्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणण्यावरही खडसे यांनी आक्षेप घेतला. ज्या पार्टीमध्ये ना दणदणाटी संगीत होते, ना डान्स , ना लेझर बीम, केवळ पाच-सात लोकांनी एकत्र येऊन खासगीत केलेल्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणून बदनामी करण्याचा पध्दतशीर प्रयत्न पोलिसांनी चालवला आहे,असा आरोप खडसे यांनी केला.