छत्रपती संभाजीनगर – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Social Justice Minister Sanjay Shirsat) आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (former AIMIM MP Imtiyaz Jaleel.)यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला हे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात (MIDC CIDCO Police) तक्रारी (complaints)दाखल केली.
समाजमाध्यमावर (social media post) इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याने बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे आणि सावजी म्हस्के या चौघांनी शिरसाट समर्थकाला त्याच्या घरासमोर मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात बालाजी खोतकर यांच्या पत्नीने दुसरी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ती आणि तिचे पती बालाजी खोतकर हे विजय चाबुकस्वार, किरण अंगुरे आणि शुभम अंगुरे या शेजाऱ्यांच्या भांडणांनी त्रस्त होते. याबाबत विचारणा केली असता त्यांनी खोतकर यांना बेदम मारहाण केली.
काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर हॉटेल विट्स (hotel vits)लिलाव आणि एमआयडीसी (MIDC)भूखंड आणि हरिजन समाजाची १० एकर जमीन त्यांच्या मुलांच्या नावे करून ती कमी भावात मिळवल्याचा आरोप केला. या आरोपानंतर काही संघटनांनी समाज माध्यमांवर जलील यांच्या घरावर शेण फेकून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.या आंदोलकांना जालन्यातील कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शिरसाट यांच्यावर आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लक्ष्मण हिवराळे यांनी जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे शिरसाट आणि जलील यांचे समर्थक एकमेकाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.