उत्तर प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडाचाअपघात! नवरदेवासह ८ ठार

Accident in Uttar Pradesh

लखनौ -उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका चारचाकीचा (four-wheeler) भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच तर आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. ६ जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवरदेवाला (Groom)घेऊन लग्नाला चालले होते. यावेळी त्यांची चारचाकी जुनावई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर जोरात आदळली.

या अपघातानंतर (accident) स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य करत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या आणखी ६ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, अपघात इतका भयंकर होता की चारचाकी भिंतीमध्ये अडकली होती. जेसीबीच्या साहाय्याने ती भिंतीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या गाडीत एकूण १४ जण होते.