Adani Buys Tenth Jet Worth ₹1000 Crores
Adani Buys Tenth Jet – उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani)यांनी अमेरिकन विमान कंपनी बोईंगकडून सुमारे १००० कोटी रुपये किमतीचे एक आलिशान बिझनेस जेट (व्हीटी-आरएसए) (VT-RSA)खरेदी केले आहे. हे जेट ७३७-मॅक्स ८-बीबीजे (Boeing 737-Max 8-BBJ)मालिकेचे असून ते एकदाच इंधन भरल्यानंतर भारतातून थेट अमेरिका-कॅनडापर्यंत पोहोचू शकते. अदानींच्या ताफ्यातले हे दहावे व्यावसायिक जेट विमान(tenth business jet) आहे.
अदानी यांच्या नवीन विमानाने स्वित्झर्लंडच्या बासेल शहरापासून ९ तासांत ६३०० किमी अंतर कापले आणि काल सकाळी १० वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. या विमानाचे पाण्याच्या तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, २४ ऑगस्ट २०२४ मध्ये रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही या मालिकेतील एक विमान खरेदी केले होते. बोईंग ७३७ मॅक्स २०० आसनी विमाने अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट या कंपन्यादेखील वापरतात. आता उद्योगपतीदेखील ही विमाने त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी खरेदी करत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
शाहरुख खान-दीपिका पादुकोणसह हुंडई कंपनीच्या सहा जणांवर गुन्हा