बेळगावनंतर निपाणीतही आता कन्नड भाषेची सक्ती

Kannada Language Compulsory in Nipani

निपाणी – बेळगाव (Belagavi) पाठोपाठ आता जिल्ह्यातील निपाणी (Nipani) शहरातही कन्नड भाषा (Kannada language)सक्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.कारण सीमाभागातील निपाणी शहरात दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच दुकानदार व व्यापाऱ्यांनीही त्यांच्या नामपाट्यांवर ६० टक्के कन्नड व ४० टक्के मराठी भाषेचा वापर करावा,अशा सूचना शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आल्या.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सुभाष संपगावी (Sub-Divisional Officer Subhash Sampagav) होते.यावेळी तहसीलदार, महसूल (revenue), पोलीस, शिक्षण (education), नगरपालिका विभागाचे अधिकारी (municipal departments) तसेच विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. प्रांताधिकारी संपगावी यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या (state government)आदेशानुसार सीमाभागात (border areas) कन्नड भाषेला प्राधान्य देणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये ६० टक्के कन्नड (60% Kannada) व ४० टक्क मराठी (40% Marathi)भाषेचा वापर करावा. हे धोरण राबविणे ही सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी असणार आहे.सरकारी कार्यालयीन पत्रव्यवहार, लोकांशी संवाद आदी सर्व बाबतीत कन्नड भाषेचा प्रभाव जाणवला पाहिजे,अशी शासनाची भूमिका आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाने, हॉटेल, कॅफे आदी आस्थापनांच्या पाट्यांवरही कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, असे या बैठकीत सांगण्यात आले.