उत्तरकाशीच्या जलप्रलयानंतर पाळधीतील १३ युवक परतले

After the Uttarkashi flash flood, 13 youths from Paladhi have returned.

After the Uttarkashi flash flood, 13 youths from Paladhi have returned.


जळगाव – उत्तराखंड येथील उत्तरकाशीतील (Uttarkashi flood)जलप्रलयानंतर जळगाव (Jalgaon)जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांच्या पाळधी गावातील १३ युवक (Uttarakhand)अडकले होते. (13 youths return Paladhi)ते आज सुखरूप त्यांच्या गावात परतले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.(Paladhi youth Uttarkashi)
त्यांच्यातील तरुणाने सांगितले की, आम्ही गंगोत्री येथे दर्शन घेतले आणि आम्हाला या दुर्घटनेबद्दल समजले. आम्ही घटनास्थळापासून फक्त २० किमी दूर होतो. पोलिसांनी आम्हाला तेथून सुरक्षित स्थळी हलवले. त्याठिकाणी नेटवर्क नसल्याने आम्ही घरच्यांशी संपर्क करू शकत नव्हतो. त्यांच्या पालकांनी सांगितले की, दुर्घटना घडली तेव्हापासून माध्यमांमध्ये बातम्या पाहात होतो. मुलांशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे आम्हाला काळजी वाटत होती.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मुलांच्या गाडीच्या लोकेशननुसार २० मिनिटे अगोदर ते तेथून गेले होते. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे आम्हाला भीती वाटत होती. परंतु मुलांनी लष्कराच्या मदतीने फोन केला. तेव्हा आम्हाला ते सुखरूप असल्याचे समजले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाशी संपर्क करून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केला. देवाच्या कृपेने रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी भाऊ घरी परतल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
उत्तरकाशीत ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेमुळे लिमचिगड पूल वाहून गेला. ज्यामुळे दळणवळण ठप्प झाले. लष्कराच्या अभियंत्यांनी युद्धपातळीवर ९० फूट बेली पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे, जे आता अंतिम टप्प्यात आहे.

या दरम्यान पोलीस आणि लष्करी पथकांनी १,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. काल ३३ हेलिकॉप्टर उड्डाणांद्वारे १९५ नागरिकांची वाहतूक झाली.