DCM Ajit Pawar Expresses Displeasure Over PWD Work
पुणे – राज्याचे (DCM) उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते.सारथी(SARATHI) संस्थेतील पीडब्ल्यूडीच्या(PWD) कामावर त्यांनी नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे आदेश दिले. यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
अजित पवार म्हणाले की, सारथी संस्थेतील पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही. त्यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे. हे असे का होता आहेत ?
अजित पवार यांच्या तक्रारीनंतर तत्काळ पीडब्ल्यूडीचे अधिकारी सारथी कार्यालयात पोहोचले. त्यांनी या पायऱ्यांची पाहणी केली. याशिवाय अजित पवारांनी या दौऱ्यात सारथी कार्यालयाच्या कामाचा आढावाही घेतला.
यावेळी माजी क्रिकेटपटू आणि (BJP)भाजपा नेते केदार जाधव (Cricketer Kedar Jadhav)यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. (malegaon sugar factory election)माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या (nilkantheshwar panal) निळकंठेश्वर पॅनेलला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. याशिवाय बारामतीमध्ये होणाऱ्या स्टेडियम संदर्भात केदार जाधव यांनी अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती आहे.