साताऱ्यातील आंबेनळी घाट पाच दिवसांसाठी बंद

Ambenali Ghat in Satara closed for five days.

Ambenali Ghat in Satara closed for five days.

सातारा – सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड काल आंबेनळी घाटात(Ghat Closed) दरड कोसळली. ही दरड हटविण्याचे काम सध्या सुरू आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून (Satara News)महाबळेश्वर–पोलादपूरला जोडणारा महत्त्वाचा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुढील पाच दिवसांसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.(Travel Advisory)

गेल्या(Local Disruption) काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (RAIN)घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाने आंबेनळी घाट पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार महाबळेश्वर ते पोलादपूर आणि पोलादपूर ते महाबळेश्वर या दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा. पुढील आदेश मिळेपर्यंत आंबेनळी घाटातील प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.