कराडच्या आदेशानेच बापू आंधळेंची हत्या! शरद पवार गटाचा दावा

Bapu Aandhale was murdered on Karad’s orders! Claims Sharad Pawar group

Bapu Aandhale was murdered on Karad’s orders! Claims Sharad Pawar group

बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगाची हवा खाणाऱ्या वाल्मीक कराडच्याच (Karad order murder)आदेशानुसार सरपंच बापू आंधळे (Bapu Aandhale murder)यांची हत्या करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी शिवराज बांगर यांनी केला.

शिवराज बांगर म्हणाले की, वाल्मीक कराडच्याच आदेशानुसार सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली. वाल्मीक हे केवळ एक प्यादे आहे. त्याच्या मागे(Bapu Aandhale news) धनंजय मुंडे यांची ताकद होती. त्या ताकदीने हे सर्व करून घेतले. त्यामुळे धनंजय मुंडे या प्रकरणातून हात झटकू शकत नाहीत. त्यामुळे बापू आंधळे खून प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. वाल्मीक कराडने माझ्याही खूनाची सुपारी दिली होती. त्याला माझे हात-पाय तोडताना लाईव्ह पाहायचे होते. पण त्याने ज्या सनी आठवलेला सुपारी दिली त्याने माझा खून केला नाही. त्यामुळे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले.(Sharad Pawar faction)

उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT)पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच वाल्मीक कराड हा तुरुंगातून सक्रिय असल्याचा आरोप केला होता. माझ्या समोरच एका व्यक्तीला तुरुंगातून वाल्मीक कराडचा फोन आला होता, असे ते म्हणाले होते.