Bihar Voter List Verification Causes Again in Lok Sabha.
नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होताच (Bihar voter list)आज विरोधकांनी बिहारमधील मतदार यादी पुनर्पडताळणीवरून जोरदार हंगामा केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तीनवेळी तहकूब करावे लागले.(Parliament chaos)
विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना ऑपरेशन सिंदूर (opretion sindoor)वर चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधी सदस्यांनी वेलमध्ये उतरून गदारोळ कायम ठेवला. यावर अध्यक्ष बिर्ला म्हणाले, तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची आहे की नाही? प्रश्नोत्तराचा तास खूप महत्त्वाचा असतो. हे सभागृह आहे. येथे वर्तन शिस्तबद्ध असले पाहिजे. कोणताही मुद्दा उपस्थित करण्याची प्रक्रिया ठरलेली आहे. कामकाज सल्लागार समितीत चर्चा झाल्यावरच सभागृहात चर्चा घेतली जाते. त्यामुळे, कृपया आपल्या जागेवर परत जावे.(Election controversy)
विरोधकांनी वेलमधून माघार घेतली नाही, (Indian Parliament)त्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १ वाजेपर्यंत आणि त्यानंतर २ वाजेपर्यंत असे तीन वेळा तहकूब करावे लागले. (Electoral fraud India
)यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, विरोधकांनी यू-टर्न घेतला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. काही वेळात सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होईल आणि संरक्षण मंत्री ऑपरेशन सिंदूरवर आपले मत मांडतील. सर्वांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. अखेर दुपारनंतर आॅपरेशन सिंदूर वर चर्चा सुरू झाली.