Home / News / Chhota Rajan : जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनचा जामीन रद्द ! सुप्रीम कोर्टाचा झटका

Chhota Rajan : जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनचा जामीन रद्द ! सुप्रीम कोर्टाचा झटका

Chhota Rajan – हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर राजेंद्र सदाशिव निखलजे (Rajendra Sadashiv Nikalje)...

By: Team Navakal
chhota rajan

Chhota Rajan – हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर राजेंद्र सदाशिव निखलजे (Rajendra Sadashiv Nikalje) उर्फ छोटा राजनला मिळालेला जामीन (bail)सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)आज रद्द केला आहे.

२००१ साली झालेल्या जया शेट्टी हत्या प्रकरणात (Jaya Shetty murder case) विशेष न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने (High Court)ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत जामीन मंजूर केला होता. मात्र, इतर गंभीर प्रकरणांत तो दोषी असल्यामुळे तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला नव्हता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यावर आज निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, छोटा राजन गेल्या २७ वर्षांपर्यंत फरार होता. ज्या प्रकरणांत त्याची निर्दोष मुक्तता झाली, ती मुख्यत्वे साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे न आल्याने झाली आहे. शिवाय तो अजूनही अनेक गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत तुरुंगातच आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, छोटा राजन तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


हे देखील वाचा

राज्यात पावसाचा इशारा ! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

फ्री फायर गेममध्ये १४ लाख गमावल्याने मुलाची आत्महत्या

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या