मेळाव्यावरून काँग्रेस-भाजपात जुंपली वडेट्टीवारांचा बावनकुळेंना टोला

Thackrey brother melava Wadettiwar v/s Bawankule

Clash Between Congress and BJP Over Thackrey brother melava Wadettiwar v/s Bawankule

नागपूर – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा काल वरळीत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील(BJP Vs Congress) घटक पक्षातील नेते उपस्थित होते, पण काँग्रेस नेत्यांनी या मेळाव्याला येण्यास टाळले. (Thackrey brother melava)या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपात जुंपली.(Wadettiwar Vs Bawankule)

भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी काँग्रेस संपली, काँग्रेसला या मेळाव्याला बोलवण्यात आले नाही अशी टीका केली. त्यावर पलटवार करीत विजय वडेट्टिवार म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र आल्याने बावनकुळेंची चिंता वाढली आहे . त्यांनी आता स्वतःची चिंता करावी .

विजय वडेट्टीवार म्हणाले की, विजयी मेळाव्याला काँग्रेसला बोलावले किंवा नाही याची चिंता चंद्रशखेर बावनकुळे यांना केव्हापासून होऊ लागली?बावनकुळे यांनी आता स्वतःची चिंता करावी. कारण दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना चिंता वाढली आहे . त्यामुळे त्यांनी दोन वेळा पंढरीची वारी करावी. शिवाय आम्ही का गेलो नाही हे आम्ही आमचे ठरवू , त्यांनी यात पडू नये. आता मी काँग्रेसमध्ये असलो तरी बाळासाहेबांच्या नेतृत्वात तयार झालो आहे. बाळासाहेबांनी कधी जात-पात धर्मपंथ मानला नाही. आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना इतका पोटशूळ आणि वेदना का होते हे समजत नाही?