DCM Ajit Pawar’s clear warning for Somayya Don’t go to mosques
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (DCM Pawar) भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP)यांना असा इशाराच दिला (Kirit Somayya) आहे की, मशिदीत जाऊ नये. त्यांच्या मशिदीत (mosques)जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
आज मशिदीवरील भोंगे व इतर मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, अबू आझमी, नवाब मलिक, झिशान सिद्दीकी, सना मलिक उपस्थित होते. यावेळी मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात आहेत, किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा मुस्लिम संघटनांनी केला.
अजित पवार यांनी किरिट सोमय्या यांना इशारा देतानाच चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशी सूचना पोलिसांना केली. मात्र, (High Court)उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांच्या आवाजाविषयी ४६-५६ डेसिबल आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे अशक्य असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. त्यांनी बैठकीत उपस्थित लोकांचा आवाजही ४६ डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे प्रात्यक्षिक उपमुख्यमंत्र्यांपुढे करून दाखवले. त्यांनी मुंबईतील १५०० अनधिकृत भोंगे उतरवल्याची माहिती दिली.
या कारवाईवर काँग्रेस नेते नसीम खान(Nasim khan) नाराजी व्यक्त करत नमूद केले की, पोलिसांचा समज आहे की, भोंग्यांची परवानगी घेतलेली नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे नियम हे डेसिबल मर्यादा पालन करण्यासंदर्भातील आहेत. पोलीस मात्र भोंगे काढत आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यास तयाzmiर आहोत. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. संपूर्ण देशात असे नियम कुठे आहेत? गुजरातमध्येही नाहीत. समाजवादी पार्टीचे (MLA Abu A)आमदार अबू आझमी म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी हेतुपुर्वक हा वाद निर्माण केला आहे. येथे महायुतीचा संबंध नाही. या वादावर तोडगा काढण्यास सांगितले जाते. आम्ही हा विषय अधिवेशनात काढणार नाही. कारण तेथे विषयाला वेगळे वळण दिले जाते. अजित पवार यांनी मुस्लिमांवर टीका झाल्यास त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा शब्द दिला होता. ते आता काय करत आहेत? सोमय्या मशिदीबाहेर कॅमेरे नेऊन व्हिडिओ चित्रित करत आहेत.