जॅकलिन फर्नांडिसची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Delhi High Court rejects Jacqueline Fernandez's petition

Delhi High Court rejects Jacqueline Fernandez’s petition

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची( Jacqueline Fernandez)मनी लाँड्रिंग प्रकरणातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने(delhi high court) फेटाळली. (PetitionRejected)या याचिकेत अंमलबजावणी संचालनालय (ED) एफआयआर (FIR)रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने तिच्याविरुद्धची ईडी कारवाई सुरूच राहणार आहे. महाठग तथा व्यावसायिक सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिनविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यामध्ये जॅकलिनदेखील आरोपी असल्याचे ईडीने म्हणणे आहे.

दिल्लीतील तिहार तुरुंगात असताना, सुकेशने रॅनबॅक्सीचे (SukeshChandrashekharCaseमाजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केली. याकरिता त्याने त्यांच्या पत्नीची २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. सुकेश कधी पंतप्रधान कार्यालयातील तर कधी गृह मंत्रालयातील अधिकारी म्हणून स्वतःची ओळख करून द्यायचा. एवढेच नव्हे तर तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही त्याच्या फसवणुकीत सहभागी होते. सुकेश त्या सर्वांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यायचा. त्यानंतर ईडीने सुकेशविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. यावेळी सुकेशची पत्नी लीना पॉल हीदेखील या प्रकरणात सहभागी असल्याचे उघडकीस आल्यावर सुकेश आणि लीनाला या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला. जानेवारी २०२१ मध्ये सुकेश आणि जॅकलीन यांचे संभाषण सुरू झाले. तो तिहार तुरंगात असतानाही जॅकलीनशी बोलायचा. ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले की, सुकेशने जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये ५२ लाखांचा अरबी घोडा, ९ लाख रुपयांच्या ३ पर्शियन मांजरी, हिऱ्यांचे सेट या महागड्या वस्तूंचा समावेश आहे.