Diva – Accused in Neha Pawar’s brutal murder acquitted due to lack of evidence.
ठाणे – दिवा येथील बँक कर्माचारी महिलेची हत्या केल्याप्रकरणीच्या खटल्यात Diva murder case ठाणे सत्र न्यायालयाने ९ वर्षांनंतर आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.acquitted due to lack of evidence सन २०१६ मधील ही घटना आहे.
नेहा राजेश पवार ही महिला दिवा येथे आरती अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह राहात होती. तर आरोपी विजयकुमार लल्लनसिंह भारती हा तिच्या शेजारच्या फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये भाड्याने रहात होता. १५ जुलै २०१६ रोजी ती कामावरून घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात नेहा संबंधित बँकेत नोकरीला नव्हती,अशी धक्कादायक माहिती मिळाली होती.त्यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले होते.
तीन महिन्यांनंतर आरती अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०१ चा मालक भाडोत्री भारती याच्याकडे घरभाडे घेण्यासाठी आला असता फ्लॅट तीन महिन्यांपासून बंद असल्याचे त्याला शेजाऱ्यांनी सांगितले.तसेच फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.त्यानंतर मालकाने कुलूप तोडून दरवाजा उघडला असता घरात पाण्य़ाच्या पिंपामध्ये नेहाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.तसेच भारती बेपत्ता झाला होता.त्यामुळे पोलिसांनी भारतीचा शोध घेऊन त्याला नेहाच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.
पोलिसांच्या तपासात पुढे असे समोर आले की नेहा आणि भारती यांचे अनैतिक संबंध होते.भारती नेहाला आपल्याशी लग्न करण्याचा हट्ट करत होता. मात्र नेहा लग्नाला नकार देत होती.त्यावरून त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती.या प्रकरणीच्या खटल्यात आरोपी भारती यानेच नेहाची हत्या केली याचा कोणताही सबळ पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही,असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.