Doctors Strike Against Permission for Homeopathy Practitioners to Prescribe Allopathic Medicines
मुंबई – राज्यातील होमियोपॅथी डॉक्टरांना ॲलोपथी औषधे देण्याची सवलत रद्द न केल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी उद्या एका दिवसासाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.(Doctors strike July 2025)
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील होमियोपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा फार्मोकॉलोजीचे प्रशिक्षण घेऊन आणिबाणीची स्थिती वगळता ॲलोपथी औषधे देण्याची मुभा दिली आहे. एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन ते यासाठी पात्र होतील असा निर्णय दिला असून त्या विरोधात डॉक्टरांच्या संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे.(Homeopathy vs Allopathy debate)
राज्यात ९१ हजार होमियोपॅथी डॉक्टर असून त्यातील ९ हजार डॉक्टरांनी एक वर्षाची औषधशास्त्रातील पदविका मिळवली आहे. डॉक्टरांच्या संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे एक वर्षांचे प्रशिक्षण एमबीबीएसच्या सखोल शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. (Medical strike against homeopathy)यामुळे केवळ एक अर्धवट वैद्यकीय सेवाच निर्माण होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे फसवेगिरी, ओव्हरडोस, दोन औषधांचे धोकादायक मिश्रण असे प्रकार होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ एका चुकीनेही रुग्ण दगावेल.(Health policy protest India)
या संदर्भात काऊंसिलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून या पत्रात सर्व धोके नोंदवण्यात आले आहेत. रुग्णांच्या जीवाला होणाऱ्या धोक्यासंदर्भात डॉक्टरांच्या संघटनेने राज्याच्या वैद्यकीय विभागालाही पत्र लिहिले आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेते ते पाहावे लागणार असून जर सरकारने होमियोपॅथी डॉक्टरांना देण्यात आलेली ही मुभा काढून घेतली नाही तर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.Doctors news update Maharashtra