Earthquake of 6.3 Magnitude Strikes Afghanistan; 800 Dead, Hundreds Injured
Afghanistan Quake Kills 800 – अफगाणिस्तानच्या(Afghanistan) पूर्वेकडील भागात काल रात्री 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भुकंपात जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला, तर अडीच हजाराहून जास्त जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हा भूकंप (quake)पाकिस्तान सीमेलगतच्या कुनार प्रांतात (Kunar province)रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जाणवला. भूकंपाचे केंद्रबिंदू नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराच्या ईशान्येस 27 किमी अंतरावर होते आणि ते केवळ 8 किमी खोलीवर असल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली.
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत झमान यांनी सांगितले, की भूकंपग्रस्त भाग दुर्गम असल्यामुळे बचाव कार्यात काहीसे अडथळे येत आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुनारमधील नूर गुल, सोकी, वतपूर, मानोकी आणि चपादारे या जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली. नंगरहार प्रांतातही 9 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनानुसार, शेकडो जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पायाभूत सुविधा आणि घरेमोठ्या प्रमाणावर कोसळली आहेत.
अफगाणिस्तानात यापूर्वीही भूकंपांमुळे मोठी हानी झाली होती. 2023 मध्ये पश्चिम भागात झालेल्या 6.3 तीव्रतेच्या भूकंपात हजारो लोकांचा बळी गेला होता. अफगाणिस्तानची भौगोलिक रचना आणि हिंदुकुश पर्वतरांगांतील टेक्टॉनिक प्लेट्सची (Hindu Kush mountain range)हालचाल यामुळे येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता असते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
२०२७ च्या जनगणनेसाठी १४ हजार ६१९ कोटींचे बजेट
रस्ते अडवून आरक्षण मिळत नाही! विखे पाटलांनी मराठ्यांना सुनावले