एकनाथ शिंदे श्रीनगरला सैनिकांसाठी रक्तदान केले

Eknath Shinde donated blood for soldiers in Srinagar

Eknath Shinde donated blood for soldiers in Srinagar.

श्रीनगर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)हे आज ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये (marethon)सकाळी सहभागी होत काही अंतर धावले.(Srinagar soldiers blood donation) यानंतर शिंदे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले. श्रीनगर विमानतळावर बहिणींनी त्यांचे राखी बांधून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पिटलला भेट देऊन तिथे सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभागी होऊन स्वतः रक्तदान केले.(Soldier welfare Srinagar)

सांगलीतील(sangli) शिवसेनेचे चंद्रहार पाटील(chandrhar patil) यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेत एक हजार पैलवानांनी श्रीनगरला जाऊन रक्तदान केले. शिंदे यांनीही रक्तदान केले.

पहलगाम(pahalgam)दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या स्थानिक सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाने शिंदे यांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा काही पर्यटकांना वाचविण्यासाठी त्याने दहशतवाद्याच्या हातातील बंदुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला जीव गमवावा लागला. यावेळी हुसेन कुटुंबाने सांगितले की, सय्यद आदिल हुसेनचा मृत्यू झाला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाला धीर दिला. सर्वात आधी त्यांनीच आमची भेट घेतली आणि मदत केली. एवढेच नाहीतर त्यांनी आम्हाला घर बांधून दिले. त्यांनी आमची साथ दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.