सावली बार मध्ये सर्वच चालायचे दमानियांचा दावा ! राजीनाम्याची मागणी

Everything used to happen at Sawali Bar claims Damania ! Demands resignation.

Everything used to happen at Sawali Bar claims Damania ! Demands resignation.

मुंबई – राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सावली बार(Sawli Bar controversy) प्रकरणावरून राजीनामा द्यावा(Yogesh Kadam resignation demand) अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania allegations)यांनी केली. मंत्री कदम यांच्या आई ज्योती कदम (Jyoti Kadam bar ownership)यांच्या नावाने असलेल्या सावली बारची माहिती घेण्यासाठी त्या कांदिवलीतील घटनास्थळी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेऊन एफआयआर व इतर कागदपत्रांची मागणी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या की, सावली बार प्रकारणात एफआयआरमध्ये डान्सबार संबधित सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले आहे. ३० मे रोजी ११ वाजताच्या सुमारास सावली बारमध्ये पाच पंचांच्या पोलीस पथकाने धाड टाकली होती. यावेळी त्यांनी २२ महिलांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांनी पुराव्यासाठी काढलेल्या व्हिडिओत अनेक धक्कादायक प्रकार दिसतात. नियमानुसार महिलांना स्टेजच्या खाली उतरण्याची परवानगी नाही. मात्र त्या महिला ग्राहकांसोबत बसल्याचे दिसते. माजी मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam bar license) यांनी याठिकाणी ऑर्केस्ट्रा परवाना असल्याचा आणि शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिल्याचा दावा केला होता.मात्र हे दोन्ही दावे तथ्यहीन आहेत. योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर परवाना आहे . तो बार रामदास कदम आणि योगेश कदम यांचाच असल्याचे स्पष्ट होते. तेच तो बार चालवतात . असे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नको. याचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर पुरावे पोलिसांकडून घेणार आहे.(Political accountability Maharashtra)
त्या पुढे म्हणाल्या की, बीडमधील एका डान्सबार प्रकरणी मी मंत्री योगेश कदम यांना भेटायला मंत्रालयात गेले होते. त्याप्रकरणी त्यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. तेव्हा मला त्याचे कारण समजले नाही . परंतु आता लक्षात आले की त्यांचा स्वत:चा डान्सबार असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या डान्सबारवर कारवाई केली नाही. जर त्यांनी काहीही चुकीचे केले नाही असे ते तर हा बार आता बंद का केला गेला आहे ?
सरकारला उद्देशून त्या म्हणाल्या की, राज्यात मंत्रिपद कोणाला द्यावे याचे कोणतेही परिमाण नाही. ज्या व्यक्तीचा डान्सबार आहे त्याला गृहराज्यमंत्रीपद देणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सत्तेतील मंत्र्यांकडून त्यांचे कोणते उद्योग आहेत याचा वचननामा मुख्यमंत्र्यांनी बनवून घेतले पाहिजे.(Minister-owned bar controversy)