चुकीच्या आगीच्या सूचनेमुळे विमानात गोंधळ! १८ जखमी

False Fire Alarm Sparks Panic on Flight, 18 Injured

माद्रिद – स्पेनच्या पाल्मा डी मल्लोर्का (Fire Alert Incident0विमानतळावर उड्डाणाच्या तयारीत असलेल्या विमानात चुकून आगीचा अलार्म वाजल्यामुळे प्रवाशांनी घाई गडबडीने विमानातून उड्या मारल्या. या गोंधळात १८ प्रवासी जखमी झाले (18 Injured Flight Panic)असून त्यातील गंभीर जखमी झालेल्या ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Madrid Flight Panic)
स्पेनच्या पाल्मा जी मल्लोर्का विमानतळावर काल रात्री बोईंग ७३७ हे विमान मँचेस्टरला जाणारे रायनएयरचे विमान उड्डाणाच्या तयारीत होते. त्याचवेळी विमानातील फायर अलार्म चुकीने वाजू लागला. (False Alarm Aviation)हा अलार्म वाजल्याबरोबर प्रवाशांनी विमानाच्या पंखावरुन खाली धावपट्टीवर उड्या मारल्या. यात १८ प्रवासी जखमी झाले. काहींना किरकोळ जखमा झाल्या असून त्यातील ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Flight Emergency Response)
अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान कोसळून २४० प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच विमानोड्डाणाविषयी प्रवाशांच्या मनात साशंकतेचे वातावरण आहे. त्यामुळेच एखादी गोष्ट चुकून जरी झाली तरी त्यावर लोक घाबरत आहेत. लोकांनी विमानाच्या पंखावरुन उड्या मारल्यानंतर विमानाच्या आपत्कालीन घसरगुंडीवरुन प्रवाशांना विमानाच्या खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडीयोही व्हायरल झाला आहे.