वसई-विरार माजी आयुक्तांच्या चालकाची ४ मुलेही पालिकेत

Four Children of Former Vasai-Virar Commissioner’s Driver Also Employed in the MNC

Four Children of Former Vasai-Virar Commissioner’s Driver Also Employed in the MNC

मुंबई – वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार(Vasai Virar Municipal Scam) यांच्या (Anil Pawar Driver)चालकाचे चारही मुले पालिका कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. ही माहिती युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवली (RTI exposes corruption)आहे. अनिल पवार यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीमार्फत त्यांच्या मालमत्तावर छापे टाकण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. (Anil Pawar ED Investigation)या नवीन माहितीमुळे माजी आयुक्तांचा नवा कारनामा उघड झाला आहे. बोहरा यांनी माजी मनपा आयुक्तांसह ठेकेदार कंपनीवरही कारवाईचीआरोप करून कारवाईची मागणी केली.(Political corruption in Vasai)

युसूफ अली बोहरा यांनी म्हटले आहे की, अनिल पवार यांनी खासगी वाहन चालक (Driver’s family in government jobs)मधुकर राऊत यांच्या तीन मुली आणि एक मुलगा अशा चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी मिळवून दिली आहे. मधुकर राऊत यांचा पगार मनपाकडून मिळणाऱ्या वाहन भत्त्यातून होतो. त्यांचा मुलगा जितेन राऊत (चालक), मुलगी मानसी राऊत (लिपिक), अपर्णा वैती – राऊत आणि सृष्टी वैती – राऊत (शिपाई) म्हणून महापालिकेत कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा पगार मनपाच्या तिजोरीतून होत आहे. या नियुक्त्या कोणतीही अधिकृत रिक्त पदांची जाहिरात न काढताच झाल्या आहेत. पात्र उमेदवारांना डावलून कमी पात्रता असलेल्यांना नोकरी देण्यात आली आहे.