Ganesh Idol Arrival मुंबईत २ ऑगस्टपासून गणेश आगमनाला सुरुवात

Ganesh Idol Arrivals to Begin in Mumbai from August 2

Ganesh Idol Arrivals to Begin in Mumbai from August 2

मुंबई- मुंबईतील परेल वर्कशॉप(Ganesh idol arrival Mumbai 2025) आणि भारतमाता परिसरातील केंद्रांमधून २ ऑगस्ट पासून मोठ्या प्रमाणावर श्री गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गतवर्षीप्रमाणे यंदाही (BMC Ganesh festival)वर्षी गणेश मंडळांचे कार्यकर्ते (Mumbai Ganpati festival)आणि पोलीस विभागाच्या संयुक्त सहकार्याने (Ganesh festival)आगमन सोहळा सुरळीतपणे पार पाडण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

गतवर्षी मिळालेल्या प्रशासकीय सहकार्यामुळे वाहतुकीवर विशेष (road closure)परिणाम न होता गणेश आगमन यशस्वी पार पडले होते. यंदाही आगमन आणि विसर्जन काळात येणाऱ्या अडथळ्यांचे नियोजनपूर्वक निराकरण करण्यासाठी समितीच्या वतीने काही महत्त्वाच्या मागण्या पुन्हा पुढे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लटकणाऱ्या केबल आणि वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, भारतमाता आणि डिलाई रोडवरील सिग्नल पोलचे बदल, लालबाग परिसरातील वाहतूक तिसऱ्या पर्यायी मार्गाने वळवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. यासोबतच, डिलाई रोडसह प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंगमुळे आगमनाच्या वेळी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, हे लक्षात घेऊन यावरही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी झाली आहे. संबंधित विभागांनी याबाबत तात्काळ पावले उचलून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनतेला कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि मंडळे परस्पर सहकार्याने काम करत आहेत.

Share:

More Posts