Garland of US Dollars Donated to Lalbaugcha Raja
Dollars Garland Donated to Lalbaugcha Raja – मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या( Lalbaug Raja) दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची रोकड जमा झाली असून दानपेटीत सोने-चांदी व परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळाले आहे. विशेष म्हणजे भाविकांकडून आलेला अमेरिकन डॉलर्सचा(garland made of US dollars) हार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचे (Bank of Maharashtra)कर्मचारी दानपेट्यांतील नोटांची मोजणी करत असून त्यात १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह परदेशी नोटाही आढळल्या. लालबागच्या राजाला भाविकांकडून मिळालेल्या दानामध्ये दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मोदक,(gold modak) सोन्याची पावपले, हार, मुकुट, अंगठ्या, नाणी, सोन्याचे गणपती तसेच एक किलो वजनाची चांदीची वीट, चांदीचे मोदक, गणपती, मुकुटं, हार, पाळणे, समया आणि फुलघरे यांचा समावेश आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची रोकड आणि अगदी क्रिकेट बॅटसुद्धा दानपेटीत मिळाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
अदानींनी १००० कोटींना दहावे जेट खरेदी केले
न्या.पांचोलींची शिफारस सर्व सहमतीने झाली नाही ! न्या. नागरत्न यांचा विरोध